| आगरदांडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा पुलाच्या दुरुस्तीमुळे अलिबाग, मुंबई, पुणे, ठाणे व इतर गाड्याचा मार्ग बदलल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने काही प्रवाशांनी एसटी प्रवास टाळत असल्याने याचा आर्थिक फटका एसटी डेपोला बसला असून दिवसेंनदिवस उत्पन्नात घट होऊ लागली. यामुळे असंख्य गाड्या अलिबाग डेपोला वळविण्यात आल्या आहेत. मुरुड जंजिरा पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातुन पर्यटक एसटीने ये-जा करित असतात. मुरुडला येण्यासाठी एसटी बस ही महत्त्वाची भुमीका बजावते. 2007 साली मुरुड आगार व्यवस्थापक पंकज ठोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला होता. यामुळे सर्वंचस्थांरावर मुरुड डेपोचे कौतुक करण्यात आले होते. पण आज हा डेपो बंद होण्याच्या मार्गावर जात असल्याने पर्यटकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरुड आगाराकरिता साध्या गाड्या 35 तर निम आराम 13 होत्या व चालक-वाहक असा एकुण 133चा स्टॉफ होता. परंतु पुलांच्या दुरुस्तीमुळे मुरुड आगारातुन साध्या 23 गाड्या, निम आराम 12 गाड्या अलिबाग डेपोला वळविण्यात आल्या. त्याबरोबर 53 चालक-वाहक ही देण्यात आले. सध्या मुरुड आगारात साध्या गाड्या 22 तर निम आराम 1 आसून चालक-वाहक 80 चा स्टाफ शिल्लक आहे. गाड्या कमीमुळे फेर्या कमी होऊ लागल्यामुळे प्रवासी खासगी गाडी मधून प्रवास करीत असल्याने एसटीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अव्वल ठरलेल्या एसटी डेपो मागे जात आहे.
रेवदंडा पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ज्या गाड्या आपल्याकडून दिल्या गेल्यात ते पुन्हा आपल्या मिळणार आहेत. सध्या आपल्या डेपो मधुन मुंबई साळाव मार्ग 6 तर भालगांव मार्ग 2, बोरिवली भालगांव मार्ग 1, कल्याण साळाव मार्ग 1, भांडुप साळाव मार्ग 1, स्वारगेट साळाव पाली मार्ग 1, शिर्डी साळाव मार्ग 1, रोहा भालगांव मार्ग 3 तर सुपेगाव1, महाड सुपेगाव मार्ग 1 तर साळाव मार्ग 1, मुरुड साळाव रोजच्या 5 फेर्या चालू केल्या आहेत.
निता जगताप, मुरुड आगार व्यवस्थापक