वडाळे तलावा संदर्भात प्रीतम म्हात्रे यांनी घेतला आढावा

। पनवेल । वार्ताहर ।
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी वडाळे तलाव येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी तेथे सुरू असलेल्या कामातील निकृष्ट दर्जाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज यांनी भेट दिली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अभियंता संजय कटेकर आणि गावडे उपस्थित होते.
यावेळी तिथे सफाई नसल्यामुळे सदर ठिकाणी दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यात यावी असे सांगितले. सदर ठिकाणी नागरिकांचा वावर सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर कचराकुंडी बसवण्यात यावी असे सुचविले. तलावाच्या सभोवताली ट्रॅकवर सीसीटीव्हीची आवश्यकता आहे ते लवकरात लवकर बसवण्यात यावे. तसेच त्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षारक्षकांसाठी उंचीवर असलेल्या मचान स्वरूपी पेट्रोलिंग केबिन असावी जेणेकरून त्या ठिकाणी उभे राहून संपूर्ण तलाव परिसर पाहता येईल. तलावाच्या संपूर्ण परिसरात तिथे 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे जेणेकरून काही रात्रीच्या वेळेस चुकीचा घटना घडतात त्या घडणार नाहीत अशी अनेक कामे त्यांनी निदर्शनास आणून दिली.
यावेळी त्यांच्यासोबत पालिका अधिकारी संजय कटेकर, सुधीर साळुंके, गावडे, मा.नगरसेवक डी.पी.म्हात्रे, शेकाप नेते गणेश म्हात्रे, जॉनी जॉर्ज, माझे सहकारी नरेश मुंढे, मंगेश भोईर, मंगेश अपराज, सुरज बहाडकर, सुजित गुळवे, दर्शन कर्डीले, रोहित मोरे, प्रशांत मोरे, रोहन गावंड, संदेश मोहन, वैभव जोशी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version