आदिवासींच्या विविध प्रश्‍नांवर आढावा समिती बैठक

| अलिबाग | वार्ताहर |

राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडीत व आदिवासी उपयोजनेतील कार्यान्वयीन यंत्रणांची आदिवासींच्या विविध प्रश्‍नांवर आगरी समाज हॉल, पेण येथे बैठक संपन्न झाली.

राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष पंडीत यांच्या अध्यतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, रोहा तहसिलदार कविता जाधव, सुधागड तहसिलदार उत्तम कुंभार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण नियोजन अधिकारी आनंदकुमार हेमाडे व इतर कार्यान्वयीन यंत्रणा उपस्थित होत्या.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.पवार यांनी केले. बैठकीमध्ये आदिवासी समाजाच्या विविध प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागामार्फत राबविलेल्या व भविष्यात राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजनेमार्फत कार्यान्वयीन यंत्रणांना देण्यात येणार्‍या निधीचा वापर आदिवासींच्या विकासासाठीच होतो किंवा कसे? याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी आढावा घ्यावा असे अध्यक्षांनी सुचित केले. सूत्रसंचलन ज्योती वाघ यांनी तर सतिश शेरमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version