उद्या शेकापच्या आढावा बैठकीचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आगामी होणाऱ्या ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यासाठी शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा बुधवारी (दि.११) सकाळी साडेदहा वाजता शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ऍड. मानसी म्हात्रे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष मा. नगरसेवक प्रदीप नाईक, मा. नगरसेवक अँड. गौतम पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. तरी शेकापचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांनी या बैठकी करिता आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा कार्यालयीन चिटणीस अजय झुंझारराव यांनी केले आहे.

Exit mobile version