नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सकल मराठा समाजाचा ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने गाव पातळीवर आढावा बैठकी घेतल्या जात असून आंदोलनाची रूपरेखा आखण्यात येत आहेत.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज असून रॉयल गार्डन येथे सकल मराठा समाजाकडून जिल्ह्या आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.त्यावेळी जिल्हा समन्वयक विनोद साबळे,कर्जत तालुक्यातील समन्वयक मधुकर घारे आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विनोद साबळे यांनी मराठा समाजाला अद्यापही आरक्षण मिळालं नाही त्याच बरोबर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवण्यात वेळ घालवत असल्याने पुन्हा एकदा सकल मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मुद्यावरून रान पेटले असून उठविण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी सांगितले.