समीक्षा नांदगावकर सेवानिवृत्ती

| मुरुड-जंजिरा | वृत्तसंस्था |

मुरूड येथील जिल्हा परिषदेच्या मांडला मराठी शाळेतील मुख्याध्यापिका समीक्षा नांदगावकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा शाळेच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. अलिबाग आणि मुरुडसहित जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजवर त्यांनी सेवा केली. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी आपल्या मनोगतात नांदगावकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन दीर्घ सेवेबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये मुरुड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, मिलिंद पालवणकर, अपर्णा नागावकर, दिशा नांदगावकर, महेश कवळे, रमाकांत ठाकूर, विष्णू लाडगे, अस्मिता भगत, किरण दिवेकर, शालिनी नागावकर, माधवी चांदोरकर, मनोज सुर्वे, दत्ता नागावकर, रुपाली मुरुडकर, स्वप्निल नांदगावकर, महेश भगत, संतोष पुकळे, सुनील काळे, मानसी कवळे, हर्षला ठाकूर, महेंद्र सातामकर, निलेश भोपी, राजेश बदे, निलेश माढा, अभिजित लाड आदी उपस्थित होते.

Exit mobile version