| माथेरान | वार्ताहर |
गेली सहा वर्षे बंद असलेली नेरळ-माथेरान मिनिट्रेनच्या मार्गावरील होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक यांनी माथेरानला भेट देऊन प्रत्येक स्थानकाची पाहणी करून केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेतला.
नेरळ येथून मिनिट्रेनने माथेरान कडे प्रस्थान केले. सध्या करोडो रुपये खर्चून हा 21 किलोमीटर अंतराचे कामे सुरू आहेत. ही कामे किती पूर्ण झाली आहेत? याची तपशीलवार माहिती घेतली. डिसेंबर पर्यंत मिनिट्रेन सुरू करण्याची असल्याने रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने लाहोटी यांनी माहिती घेतली.
माथेरानमध्ये येताच माथेरानकरांकडून लाहोटी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल हे हजर होते. लाहोटी यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी माजी नगरसेवक अरविंद शेलार उपस्थित होते. यावेळी माथेरानकरांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र मिनिट्रेन केव्हा सुरू करणार? या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्यांनी रेस्ट हाऊस गाठले.
सेल्फी स्पॉट पर्यटकांसाठी खुला
मुख्य व्यवस्थापक अनिल लाहोटी याचे स्वागत केल्यावर सिंह या प्राण्याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. रेल्वे मधील भंगार झालेल्या सामानापासून तयार करून तो पर्यटकांना सेल्फी स्पॉट तयार करण्यात आलेला आहे.