माथेरानमध्ये क्रांतिदिन साजरा

। माथेरान । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये क्रांती दिनानिमित्त वीर हुतात्मा भाई कोतवाल यांना शाळेच्या प्रांगणात आदराजंली वाहण्यात आली. या कार्यक्रमांची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी महिलांनी बल सागर भारत होवो या गीतावर अप्रतिम नृत्य सादर करून खर्‍या अर्थाने हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गावाचे सुपुत्र सुभेदार विनय धनावडे यांच्या प्रतिकृती शिल्पाचे अनावरण त्याच्या आई रतन धनावडे व पत्नी सारिका धनावडे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्याचे सर्व कुटूंब व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागाने प्रभात फेरीने वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या निवास्थानी जाऊन तेथे राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे उपस्थित होत्या.

Exit mobile version