शेतमालाच्या विक्रीने मोठी आर्थिक उलाढाल
शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन गुजराती शाळा, जुना पनवेल येथे दि 4 ते 6 मार्चदरम्यान करण्यात आले होते. शेतकर्यांच्या मालाला जागेवरच ग्राहक मिळाल्याने त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल मुंडके उपविभागीय अधिकारी (महसूल) पनवेल व दत्तात्रेय काळभोर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या महोत्सवात सुधागड तालुक्यातील रामेश्वर शेतकरी समूह गट, उद्धर या गटातील शप्रमोद लांगी व प्रियांका लांगी, अष्टविनायक पुरूष शेतकरी गट, घेरा सरसगड या गटातील मयूर पाशीलकर व अक्षय पाशीलकर, कल्याणी गुरव, भार्जे शीतल तळेकर, पेडली, लक्ष्मण लुमा जोध, चांदरगाव इ. शेतकर्यांनी सहभाग नोंदवला.
या महोत्सवात सुधागड तालुक्यातील काळा तांदुळ, लाल तांदूळ, मटकी,मुग, चवळी,नाचणी, करला (काळे तीळ), कनगर, घोरकंद, सेलम हळद (ओली), विविध बियाणे (किचन गार्डन करिता) पॅकेट, आवळा कँडी, आलेपक वाडी, च्यवनप्राश, कनगर शेवई, विविध प्रकारचे पापड, विविध सरबते इ. शेतमाल व प्रक्रिया पदार्थ विक्री करीता ठेवण्यात आले होते. सदर शेतकर्यांनी 3 दिवस त्यांच्या शेतमालाची उत्तम प्रकार थेट शेतमाल विक्री केली, ज्यामुळे त्यांना शहरातील ग्राहक मिळाले. या महोत्सवात सुधागड तालुक्याचे पूर्ण तीन दिवसांचे नियोजन प्राजक्ता पाटील (काटकर) तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. या महोत्सवात सुधागड तालुक्यातील सहभागी शेतकर्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे सुधागड तालुक्यातील अष्टविनायक पुरुष शेतकरी गट, घेरा सरसगड याना सर्वात जास्त विक्री केल्याने प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व शेतकर्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राहुल मुंडके, उपविभागीय अधिकारी (महसूल) पनवेल व दत्तात्रेय काळभोर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड, सतीश बोराडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा, ताटे उपविभागीय कृषी अधिकारीया महोत्सवात जे.बी. झगडे तालुका कृषी अधिकारी सुधागड पाली, बी.सी.वाळके मंडळ कृषी अधिकारी, भोसले, गायकवाड, जाधव, आढाव कृषी पर्यवेक्षक तसेच कृषी सहाय्यक हाटकर रोहेकर, साखरे, कापुरे, क्षीरसागर, कोळी, निरगुडा, कदम आदी मान्यवर उपस्थित होते.