। नवी दिल्ली । । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
लतादीदी या देशाची शान आणि संगीत जगतातील स्वर शिरोमणी होत्या. सर्व संगीताच्या साधकांसाठी त्या प्रेरणादायी होत्या. संगीताच्या दुनियेला स्वरसाज चढवला आहे. त्या अलौकीक प्रतिभेच्या धनी होत्या. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री




