गुजरात येथून आरसीएफ थळमध्ये आला महाकाय रिक्टर; पोहचण्यासाठी लागले 38 दिवस

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील आरसीएफ थळ कारखान्यात महाकाय रिक्टर दाखल झाला आहे. गुजरात हाजिरा येथून आरसीएफ थळमध्ये पोहचलेल्या या महाकाय रिक्टरला पोहचण्यासाठी 38 दिवसांचा प्रवास करावा लागला. आरसीएफमधील जुन्या रिक्टरला 30 वर्ष झाल्यानंतर तो बदलून नव्याने जोडण्यात येणार आहे.

गुजरातमधील हाजिरा येथून एल अँड टीमधून हा रिक्टर मागविण्यात आला आहे. 19 जुन रोजी हजिरा येथून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 38 दिवसांचा प्रवास करून तो आज थळमध्ये दाखल झाला. 275 टन त्याचे वजन आहे. 45 ते 50 मिटर लांबी आहे. नाब्रोज ट्रान्सपोर्टने तो आणण्यात आला. लवकरच सोयीनुसार शट डाऊन घेवून नियोजनपूर्वक तो बसविण्यात येणार आहे.

Exit mobile version