| पनवेल | वार्ताहर |
प्रामाणिक रिक्षा चालकाने त्याला रिक्षा प्रवासादरम्यान मिळालेला मोबाईल फोन संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना परत केल्याने त्या रिक्षा चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय करणारे अशोक घनवट नवीन पनवेल येथे राहणारे हे कळंबोलीवरून प्रवासी घेऊन ओरियन मॉलला आले असता घाई गडबडीत प्रवाशाचा महागडा मोबाईल रिक्षात विसरून राहिला. थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक अशोक घनवट यांना प्रवाशाचा मोबाईल राहिल्याचे लक्षात आले. सदर प्रवाशाने मोबाईलवर कॉल केला असता रिक्षा चालक यांनी मोबाईल उचलून तुमचा मोबाईल सुरक्षित आहे असे सांगितले. त्यानंतर प्रवाशाला परत केला रिक्षा चालक अशोक घनवट याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक सर्वत्र होत आहे.