‘ती’च्या हाती ‘अबोली’चे स्टेअरिंग

शेलू येथील दोन महिलांना रोटरीकडून रिक्षा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेलू येथे ग्रामीण रोटरी क्लबकडून तेथील दोन महिलांना अबोली रिक्षा घेऊन दिल्या आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी देवनार रोटरी क्लबकडून महिलांसाठी रिक्षा घेऊन देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता शेलू स्थानकात महिला रिक्षाचालक पाहायला मिळणार असून, दोन महिलांची कुटुंबे रोटरीच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी रिक्षा ड्रायव्हिंगसाठी आवाहन करण्यात आले होते. नावे आली होती, त्यासाठी शेलू गावातील दोन महिलांनी नावे दिल्यानंतर त्या महिलांचे पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून लायसन्स आणि रिक्षा परमिट ही सर्व जबाबदारी रोटरीकडून पार पाडण्यात आली. त्यासाठी देवनार रोटरीच्या विद्या, अलका मुरली आणि पद्मा कपूर यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्या पर्यटनातून आणि रोटरीच्या मध्यमनातून शेलू गावातील मेघा रमेश भोईर आणि तनिष्का सिद्धेश हिरेमठ यांना रिक्षा देण्यात आल्या आहेत.

रोटरी ग्रामीण मंडळाचे कर्जत तालुका समन्वयक अर्जुन तरे आणि ग्रामीण रोटरीच्या खजिनदार रेखा हिरेमठ यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. आबूली रिक्षा देण्यात आलेल्या महिला रिक्षाचालक मेघा रमेश भोईर यांचे पती अपंग आहेत.

Exit mobile version