रिंकू सिंगने अखेर मौन सोडले

भावनिक व्हिडिओ होतोय व्हायरल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

रिंकू सिंगची टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे बर्‍याच जणांनी बीसीसीआय आणि निवड समितीवर जोरदार टीका केली. पण या सर्व गोष्टीनंतर रिंकू सिंग हा शांतच होता. पण रिंकूने संघाबाहेर झाल्यावर आपली पहिली प्रतिक्रीया आईला दिली आहे. रिंकूने आईला फोन केला आणि त्यानंतर त्याने आपल्य भावनांना वाट मोकळी करून दिली. यानंतर रिंकूच्या वडिलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रिंकू सिंगची टी-2- वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड होईल, असे सर्वांनाच वाटत होते. कारण रिंकूला संघाबाहेर काढण्याचे कोणतेही कारण दिसत नव्हते. पण जेव्हा भारताचा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा त्यामध्ये रिंकूचे नाव नव्हते. रिंकूला भारताच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. रिंकूला यावेळी संघाबरोबर ठेवण्यात आले आहे. पण राखीव खेळाडू म्हणून. त्यामुळे चाहते बीसीसीआयवर चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर रिंकूने आपलं मन आईकडे मोकळं केले.

सध्या रिंकूच्या वडिलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रिंकूचे वडिल म्हणाले की, ”रिंकूची भारताच्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या संघात निवड होईल, असे आम्हाला वाटले होते. त्यासाठी आम्ही आनंदात होतो. फटाके वगैरे आम्ही आणून ठेवले होते. पण टी-20 संघात रिंकूची निवड झाली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत.” त्यानंतर पत्रकाराने वडिलांना विचारले की, यावेळी रिंकूबरोबर तुमचं काही बोलणं झालं आहे का, त्यावर रिंकूचे वडील म्हणाले की, ” भारताचा संघ जाहीर झाला आणि त्यानंतर रिंकूने फोन केला होता. यावेळी रिंकू त्याच्या आईशी बोलला. रिंकूने आईला सांगितले की, मी संघ जाहीर झाल्यावर निराश झालो आहे. पण तरीही संघाबरोबर मला जाण्याची परवानगी मिळाली आहे. राखीव खेळाडू म्हणून मी संघाबरोबर असणार आहे.” रिंकू सिंगसारखा धडाकेबाज फलंदाज भारतीय संघात नाही, यावर अजूनही चाहत्यांचा विश्‍वास बसत नाही. रिंकूची निवड झाली नसल्यावर चाहते निराश झाले आहेत. पण त्याचवेळी रिंकूला या गोष्टीचा किती धक्का बसला असेल, याचा कोणीही विचार करू शकणार नाही.

Exit mobile version