महाराष्ट्राच्या माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा
| तळा | प्रतिनिधी |
सेरेब्रल पाल्सी या मेंदूच्या पक्षाघाताच्या आजारावर मात करून कळसूबाई सर करणारा रायगडचा 22 वर्षीय ऋषिकेश माळी याने महाराष्ट्राच्या माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत जिद्द दाखवली. महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे 1646 मीटर उंच कळसूबाई शिखर रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सेरेब्रल पाल्सी असलेल्या ऋषिकेश माळी या युवकाने मन बुद्धी, इच्छाशक्ती, धैर्य, चिकाटी आणि अविरत प्रयत्नांच्या जोरावर सर केले आहे.
शिखरावर पोहोचताच त्याने भारतीय तिरंगा फडकवत आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. सेरेब्रल पाल्सी असूनही असामान्य कामगिरी जन्मतःच असाध्य आणि आजन्म सोबत राहणाऱ्या सेरेब्रल पाल्सी या आजाराशी झुंज देताना ही ऋषिकेशने शिक्षणातही उत्तुंग यश मिळवले आहे. तो रसायनशास्त्र विषयात पदवीधर असून, औषध शास्त्र पदविका देखील पूर्ण केले आहे. नुकत्याच संभाजीनगर येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक पटकावला होता.
बहुधा सेरेब्रल पाल्सी असलेल्या दुर्लभ श्रेणीतील असा पराक्रम करणारा तो महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिनीज बुक आँफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात पात्र झाला असून, शासनाने योग्य सन्मान करावा अशी मागणी दिव्यांग संघटनेकडून केली जात आहे. पालकांची भक्कम साथ मनात सुप्त इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. परंतु, शिव ऊर्जा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी आवश्यक प्रेरणा दिली आणि त्याच्या पालकांनी दिलेल्या निस्वार्थ पाठिंब्यामुळे हे स्वप्न साकार झाले. ऋषिकेशच्या आई शितल माळी यांनी त्याला आयुष्यभर परिस्थितीशी लढण्याचे बळ, धैर्य आणि सकारात्मकता दिली. त्यांनी दिव्यांग पालकांना संदेश देताना दिव्यांग मुलांना देवाघरची फुले न समजता त्यांना उभे करणे, चालायला शिकवणे, आणि जीवनात पुढे नेणे ही आपल्या पालकांची जबाबदारी आहे. असे आत्मविश्वासाने सांगतकठीण मार्ग, खाचखळगे आणि धोके ओलांडत त्याने शिखर सर केले. धुकं, अंधुक प्रकाश, काटेरी मार्ग, दगडगोटे, तीव्र चढ-उतार, 80/90 अंशाच्या उतारांच्या शिड्या सर्व अत्यंत धोकादायक अडथळ्यांवर मात करत ऋषिकेशने आपली प्रत्येक पायरी स्थिर आणि मजबूत करत अथक मेहनतीनंतर सर्वोच्च शिखर गाठले. ऋषिकेशला पीएनपी एज्युकेशन सोसायटी, अलिबाग कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळा चेअरमन समीर बनकर, शिवाजी गाडे, कचरू चांभारे, सागर बोडके, अर्जुन सोनकांबळे, चंद्रकांत शेळके, माया जगताप, फजल हलदे, राजाराम धुमाळ, रमेश जैन, नारायणसिंग राजपूत या मंडळीनी ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
दिव्यांग मुलांमध्ये कमतरता नसतात, त्यांची क्षमता दाखवण्यासाठी संधी आणि प्रेरणा दिली पाहिजे. प्रेरणा देणारे आणि साथ करणारे हात गिर्यारोहणासाठी अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
-ऋषिकेश माळी







