क्रॉस कंट्रीत ऋतुजा पातेरे अजिंक्य

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

बुलढाणा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री महिला स्पर्धेत सुधागड तालुक्यातील रामवाडी-पाच्छापूर येथील ऋतुजा राजू पातेरे हिने अजिंक्यपदाला गवसणी घातली. ठाणे जिल्ह्यातून राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तिची निवड झाली. या स्पर्धेत तिने महिला गटातून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

विविध वयोगटानुसार अनुक्रमे 2, 4, 6, 8 किलोमीटर मुले/मुली आणि 10 किलोमीटर पुरुष/महिला खुला गट यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांतून एकूण 507 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ऋतुजाने 10 किलोमीटर अंतरासाठी 51 मिनिटे 17 सेंकद अशी नोंद करून अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेसाठी तिला दिव्या अकादमी ठाणे संचालक डॉ. एकनाथ पवळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक प्रल्हाद खेतले व कपिल मांढरे यांच्या अथक परिश्रमातून विविध स्तरांवरील मॅरेथॉन स्पर्धेतील यश मिळत असल्याचे ऋतुजाने कृषीवलला सांगितले.

Exit mobile version