सावित्री नदीपात्रात रिव्हर राफ्टिंग

। पोलादपूर । वार्ताहर ।
जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्याने पर्यटन विकास अडचणीत आला होता. मात्र पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची आज ट्रायल घेण्यात आली. यावेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दिपक उतेकर, सुमित दरेकर व टिमचे सदस्य उपस्थित होते. तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी नरवीर रेस्क्यू अन्ड अ‍ॅडव्हेंचरच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने रानबाजिरे धरण ते लोहारमाळ तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टींगची ट्रायल रन घेण्यात आली असल्याचे यावेळी रामदास कळंबे यांनी सांगितले.

Exit mobile version