रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महापालिकेच्या चारही प्रभागतील रस्ते दुरूस्तीच्या कामांना वेग आला असून, रस्ते दुरूस्तीच्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या आदेशानुसार, चारही प्रभागातील रस्ते दुरूस्तीच्या कामांवर बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कनिष्ठ अभियंता रात्रंदिवस रस्ते दुरूस्तीची कामे करत आहेत.

सध्या महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागातील रस्ते दुरूस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे स्वतः विविध ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.

शहर अभियंता संजय कटेकर व कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागामध्ये रस्ते दुरूस्तीची कामे केली जात आहे. खारघर येथील सेक्टर 35डी मधील रस्ता दुरूस्ती काम सुरू आहे. याचबरोबर कामोठ्यामधील सेक्टर 10 मधील रस्ते दुरूस्तीचे काम वेगाने सुरू आहे. नवीन पनवेलमध्ये सेक्टर 4, सेक्टा 19, सेक्टर 1मध्ये रस्ते दुरूस्ती जोमाने सुरू आहे. याचबरोबर कळंबोलीमधील बालाजी स्कूलजवळील रस्त्याची कामे व सेक्टर 17 मधील रस्ते दुरूस्तीची कामे सुरू आहेत. याचबरोबर नवीन पनवेलमधील डीमार्ट रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे.

Exit mobile version