अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई -पुणे महामार्गावर होणार्‍या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर युनिव्हरसिटी समोरील पार्किंग येथे अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग संदीप भागडीकर, महामार्ग पोलीस पनवेल विभागाच्या गौरी मोरे यांच्या मागदर्शनाखाली रस्ता सुरक्षा जनजागृती संदर्भात प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तानाजी चिखले, संदीप भागडीकर, गौरी मोरे, गणेश बुरकुल यांच्यासह वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी महामार्गावर होणारे अपघात त्याचे कारणे व परिणाम तसेच सदर अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन हवर्सचे महत्व याचे अनुषंगाने रस्ता सुरक्षा जनजागती या विषयावर प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या 40-50 वाहन चालक यांना वाहतुकीचे नियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून महामार्गावर वाहतूक करणार्‍या वाहन चालक यांनी महामार्गावर दिलेल्या वाहतूक चिन्हांचे व सूचनांचे अनुसरून वाहन चालवणे व वाहतुकीचे नियमांचे पालन करण आदींचा मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महामार्गावर वाहने चालवताना पालन करावयाच्या नियमांचे माहितीपत्रके उपस्थितांना वाटप करण्यात आले.

Exit mobile version