नवेदरबेली शाळेत रस्ता सुरक्षा अभियान

| कोर्लई | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी केले. पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलच्या आर.एस.पी.च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख मान्यवरांना मानवंदना देण्यात येऊन स्वागत करण्यात आले.

तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, केंद्र प्रमुख संदीप वारगे, प्रदिप झेमसे, प्रशांत म्हात्रे, दिपक चव्हाण, मंगेश कावजी, आर.एस.पी.अधिकारी डोंगरे, प्रियांका ठाकुर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश राऊत, परशुराम पाटील, माजी मुख्याध्यापक जे.बी.वाणी, आर.डी.नाईक, दिपा फाळके, शिंदे मॅडम, विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड.के.डी.पाटील यांनी तर मुख्याध्यापिका दिपा फाळके यांनी आभार मानले.

Exit mobile version