महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान

हमरापूर येथे पंकज चव्हाण यांचे मार्गदर्शन
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
रस्ते सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करुन रस्ते अपघात कमी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर पनवेल-गोवा महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे अंतर्गत हमरापुर दूरक्षेत्र चौकी येथे पोलीस उपनिरीक्षक पंकज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या सहकारी पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने महामार्गावरील दुचाकी, चारचाकी व इतर वाहन चालकांना अपघात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. म्हणून अपघात रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम व आपल्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करुन रस्ता सुरक्षा अभियानांर्गत जनजागृती चव्हाण यांनी केली.

Exit mobile version