पेणमध्ये रस्ता सुलभीकरण अभियान

नगरपरिषदेच्या पुढाकारातून उपक्रम


| पेण | प्रतिनिधी |

शहरामध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर, सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्या अनुषंगाने दर महिन्यात किमान एकदा स्वच्छता अभियान घेण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, त्यानुसार दि. 19 जानेवारी रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान घेऊन रस्त्याचे सौंदयींकरण करण्यात आले.

पेण नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशद्वारापासून धरमतर रोड येथे स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत रस्त्यालगत असलेली गटारे स्वच्छ करण्यात आली. तसेच दुभाजकालगत साठलेली माती काढून स्वच्छ करण्यात आले. अतिरिक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विद्युत पोल सुस्थितीत करण्यात आले. रस्ता रुंदीकरणामध्ये व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणी करण्यात आली. या अभियानात मुख्याधिकारी जीवन पाटील, सुहास कांबळे नगर अभियंता, शिवाजी चव्हाण आरोग्य निरिक्षक, अंकिता इसाळ स्वच्छता अभियंता, रेश्मा करबेले विद्युत अभियंता, निकिता पाटील संगणक अभियंता, महेश वडके, उमंग कदम, भरत निंबरे, किशोर जाधव, दिलीप गायकवाड स्वच्छता निरीक्षक, गौतम मोरे व इतर कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पत्रकार बंधू उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाकरिता एक जेसीबी, एक ट्रॅक्टर व पेण नगरपरिषदेचे 60 कायम व कंत्राटी सफाई कामगारांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आले. सदर अभियान पेण नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व नागरिक असे एकूण 130 जणांच्या मदतीने यशस्वी करण्यात आले. अभियानादरम्यान 0.80 कि.मी. रस्ता स्वच्छ करण्यात आला व 1 ते 2 टन कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे वाहतूक करण्यात आला.

Exit mobile version