| पनवेल | वार्ताहर |
बँकेतून रोकड काढून पायी जात असलेल्या इसमास अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 येथील कॅनरा बँकेतून सदर 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आपल्या खात्यातून 2 लाख रुपयाची रोख रक्कम काढून घरी पिशवीतून घेऊन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील रोख रक्कम हिसकावून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.