घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास

खोपोलीतील घटनेने परिसरात खळबळ
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील नावंढे परिसरात चोर्‍यांच्या घटना घडू लागल्याचे समोर येत असून, सोमवारी येथील एक घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडून चोरट्याने कपाट खोलून त्यातील जवळपास साडेतीन लाखांचे सोने व 40 हजारांची रोखड असा एकूण चार लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नावंढे ग्रामपंचायत हद्दीत घोडीवली येथील मनोहर गोटीराम काठवले हे पत्नी, आई आणि दोन मुली असे सोमवारी, दि. 28 मार्च रोजी रात्री गाड झोपेत असताना रात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा मागचे दार उघडून बेडरूममध्ये प्रवेश करून कपाट खोलून तिजोरीच्या चाव्या मिळवून त्यांच्यातील 3 तोळ्यांची गंठन, दोन चेन, दोन कानातील सेट, एक अंगठी, पैंजण सात जोड, रोख रक्कम 40 हजार असा एकूण जवळपास चार लाखांचा ऐवज लंपास केला.

या घटनेची खालापूर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Exit mobile version