| खोपोली | वार्ताहर |
खोपोली येथील तरुणाने ऑनलाईन रमीच्या नादात कर्जबाजारी झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.7) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. साईबाबानगर येथील सुनील नडवीरमणी (32), रा. साईबाबानगर, खोपोली असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने साईबाबानगरवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील सुनील नडवीरमणी हा तरुण सोमवारी औषध आणायला जतो म्हणून घराबाहेर पडला. बराचवेळ तो घरी आला नाही, म्हणून शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह खोपोली रेल्वे स्थानकामध्ये आढळून आला. त्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. सुनीलला ऑनलाइन रमी खेळण्याची सवय होती. यामध्ये तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा होती.