रोहा स्फोट प्रकरण! तरुणीचा करूण अंत

| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलिंडरचा मोठा स्फोट झाला होता. त्या अनपेक्षीत स्फोटात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यातील जखमी भावना घोसाळकर (वय 22) या तरुणीचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भावनाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गॅस कंपनीकडून विमा व शासकीय मदत बाधीत कुटुंबाला मिळावी, जखमींना लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्फोटातील दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने उपचारार्थ मुंबई येथील केईएम रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.

घर, घरातील साहित्य याचे अतोनात नुकसान झाले. स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला होता. भावना घोसाळकर हिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद देणे थांबल्याने अखेर भावना घोसाळकर हिची प्राणज्योत मालवली.

Exit mobile version