| चणेरा | प्रतिनिधी |
पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याचा रोहा प्रेस क्लबने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या या केवळ व्यक्तीस्वातंत्र्यावर नव्हे, तर लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे सांगत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी रोहा प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लब यांच्या राज्यव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. यावेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लबचे राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष सुहास खरीवले, सचिव रविंद्र कान्हेकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव व अंजुम शेट्ये, मुख्य संघटक उद्धव आव्हाड, सह सचिव दीपक भगत, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मरवडे, संघटक संतोष सातपुते, सागर जैन, संरिप सरफळे, महेंद्र मोरे, राकेश मोरे, भिवा पवार यांच्यासह अनेक पत्रकार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा प्रेस क्लबचा आक्रमक पवित्रा
