। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्येष्ठ पत्रकार व कुरूळ ग्रामपंचातीचे सरपंच स्व. अॅड. जनार्दन पाटील यांना पत्रकारांतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. रायगड प्रेस क्लब आणि अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 6) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात अॅड. जनार्दन पाटील यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अॅड. जनार्दन पाटील यांना श्रध्दांजली वाहताना सारेच भावूक झाले होते.
![](http://krushival.in/grygrars/2022/07/WhatsApp-Image-2022-07-06-at-4.40.06-PM-1-1024x682.jpeg)
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, प्रफुल्ल पवार, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, महेश पोरे यांनी अॅड. जनार्दन पाटील यांना श्रध्दांजली वाहिली.
![](http://krushival.in/grygrars/2022/07/WhatsApp-Image-2022-07-06-at-4.40.06-PM-1024x682.jpeg)
अॅड. वैभव भोळे, प्रभाकर पाटील, आदर्श नागरी सहारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, संचालक अभिजित पाटील, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, जगदीश पाटीली, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील, लायन्स क्लबचे महेद्रं पाटील, प्रमोद पात्रे यांच्यासह अलिबाग प्रेस असोसिएशनचे सदस्य, रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी, आदर्श नागरी सहाकरी पतसंस्थेचे कर्मचारी शेकसभेला उपस्थित होते.