रोहाः झाडी झुडपांमुळे अपघाताचा धोका

। खांब । वार्ताहर ।

रोहे तालुक्यातील खांब-पालदाड मार्गावरील खांब-देवकान्हे हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडी झुडपांमुळे अपघाताचा धोका वाढला असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील अंतर्गत मार्गापैकी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या मार्गावरील देवकान्हे ते खांब पर्यंत ठिकठिकाणी पडलेले लहान मोठे खड्डे, रस्त्यावर पसरलेले छोटे मोठे दगड गोटे यामुळे येथून मार्गक्रमण करताना अक्षरक्षः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यातच पावसामुळे येथे वाढलेल्या मोठाल्या झाडी झुडपांमुळे तर अपघाताला आयतेच निमंत्रण मिळत आहे. दैनंदिन वाहतूक व प्रवासाचा विचार करता येथून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच कंपनी कामगार, शेतकरीवर्ग, पायी चालणारे व सयकलवरून प्रवास करणारे प्रवासी यांना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी असे प्रवासीवर्ग व स्थानिक रहिवासी नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version