रोहा तालुका धान्य गोदाम परिसरात घाणीचे साम्राज्य

। रोहा । प्रतिनिधी ।

तालुका धान्य गोदामाची पावसाळी हंगामातील अवस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही बिकट परिसरात घाणीचे व डुकरांचे साम्राज्य दिसून येत आहे. धान्य वितरण करण्यात येते त्याच ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली असून सांडलेले, कुजलेले धान्य खाण्यासाठी डुकरांचा वावरही दिसून येत आहे.

पावसामुळे धान्याला दुर्गंधी येत असून असे धान्य ग्राहकांपर्यंत वितरीत होत आहे. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असून फोटो अथवा वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर थातुरमातुर डागडुजी केली जाते. ग्रामीण भागातील लोकांना मिळालेले धान्य कोणत्या अवस्थेतून आले आहे हे माहित नसते. खर तर शासन प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून प्रचार करते. मात्र ते नियम स्वतः पाळतांना दिसून येत नाही. या हलगर्जीपणाला अजून तरी जाब विचारला गेलेला नाही. कारण या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसावा, असे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

रोहा तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असून तातडीने डुकरांचा बंदोबस्त करण्याची गरज दिसून येत आहे.

Exit mobile version