रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची कमिटी जाहीर

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची सहविचार सभा पंचायत समिती रोहा येथील द.ग.तटकरे सभागृहात संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून दिपक चिपळूणकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणीचा कालावधी पाच वर्षांचा असून डी.एस.सावंत यांची कार्याध्यक्ष म्हणून तर अमोल तांबडे सचिव तर अशोक गुट्टे यांची सहसचिव, जी.एस.शिद खजिनदार, आप्पासाहेब कांबळे व यु.डी.पाबरेकर यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. रेश्मा पाटील यांची महिला सहसचिव तर रेश्मा वेटकोळी यांची महिला उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीला भावी वाटचालीसाठी गट विकास अधिकारी अनिकेत पाटील, सभापती गुलाब वाघमारे, उप सभापती रामचंद्र सकपाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version