रोहा तालुका शेकापतर्फे महाड पोलादपूर पूरग्रस्तांना मदत

रोहा | प्रतिनिधी |

रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाड ,पोलादपूर येथील पूरग्रस्तांना धान्य,बिस्किटे, साखर,चहा पावडर, कपडे,मेणबत्ती, माचिस,मॅग्गी पाकिटे,कपडे,साड्या,टॉवेल, पोहे,पाणी बॉक्स,मच्छर अगरबत्ती अशी भरीव मदत पाठविण्यात आली असून याप्रसंगी शेकाप नेते पंडीत पाटील उपस्थित होते.

शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले असून आपत्कालीन यंत्रणा आहे कुठे असा सवाल यावेळी पंडीत पाटील यांनी केला आहे.२००५ साली झालेल्या महापुरानंतर देखील प्रशासनाने काहीच बोध घेतलेला नाही.कोकणातील जनता कोरोना ,निसर्ग व तौक्ते चक्रीवादळे,अतिवृष्टी,महापूर अशा संकटांना सातत्याने सामोरी गेली आहे.शासनाने मात्र कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केले आहे. वादळाच्या भरपाई पासून आजही काहीजण वंचित आहेत. भरमसाठ विज बिले येत असून बिल न भरल्यास महावितरण तातडीने वीज कनेक्शन कापत असून सक्तीने वीज बिलांची वसुली केली जात आहे.कोकणासाठी शासनाने पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे असे मत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.रोहा तालुक्याच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीमध्ये तालुका चिटणीस राजेश सानप,गणेश मढवी,हेमंत ठाकूर,विठ्ठल मोरे,,जितेंद्र जोशी, कांचन माळी, संजीवनी चाळके,जयश्री जोशी,बिनधास्त धनावडे,प्रमोद भोसले, हरेश म्हात्रे,मंगेश ढमाल, जीवन देशमुख, निखिल मढवी,मिनाक्षी म्हात्रे,नंदेश यादव,अशोक कोशिमकर,नंदिनी यादव,सुबोध देशमुख, अरविंद भिलारे,संतोष दिवकर,प्रतिक कांडणेकर,लियाकत खोत,खेळू ढमाल, गोपीनाथ गंभे,स्मित मापारी,शशिकांत कडू,पूनम गोविलकर, विलास म्हात्रे,पांडुरंग भेरे, खुटल महिला मंडळ,अमोल शिंगरे, दिगंबर साळे, तानाजी म्हात्रे,पांडुरंग ठाकूर,दिपा ठाकूर,गणेश खरीवले,समीर खरीवले,दिलीप म्हात्रे,रत्नदीप चावरेकर,बाळा भोईर,नरेंद्र मरवडे,प्रकाश धुमाळ,राजू कांबळे,गणपत म्हात्रे,अनंता वाघ,आरिबा दादण, दिपक पाडगे यांनी सढळहस्ते मदत केली आहे.प्रणित टेमकर यांनी सदर साहित्य पूरग्रस्तांपर्यंत मोफत वाहन उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version