| सुकेळी | वार्ताहर |
क्रांती ज्योत पदयात्रा मित्र मंडळ दमखाडी यांच्या वतीने रोहा ते शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा 17 वर्षांपासून अखंडपणे साजरा होत आहे. यावर्षी देखील शनिवार (दि.13 ) रदमखाडी (रोहा) येथुन शिर्डीकडे जाण्यासाठी पालखी पदयात्रेचा भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
रोहा येथुन निघालेली पालखी भिसे खिंडीमार्गे वाकण-खोपोली मार्गाकडे रवाना झाली. यावेळी अनेक भक्तगणांनी पालखीचे दर्शन घेऊन पदयांत्रींना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गुरुवार दि.25 रोजी दमखाडी येथे साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.