अतिवृष्टीमुळे छप्पराची पडझड

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे.पावसाने 1000 हजार मिलिमीटर आकडा पार केला असून पावसाचे प्रमाण वाढतच आहे. सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत असताना मुरुड मजगाव- खारीक वाडा परिसरातील हशा पांडुरंग ढोलके यांच्या घराचे छप्पर व भिंत पडली असून त्यांच्या राहत्या घराच्या मोठे नुकसान झाले आहे. तलाठी यांच्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. त्यांचे सुमारे 30 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ग्रामस्थ सागर राऊत, संतोष गाणार यांनी मदत कार्यात महत्वाची मदत केली. सदरील अचानक संकट आल्याने सदरील कुटुंब भयग्रस्त झाले आहे. तहसील कार्यालयाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version