पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना गुलाब

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत आणि नेरळ पोलिस ठाणे हद्दीमधील मुस्लिम धर्मियांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येणार्‍या मुस्लिम बांधवांना कर्जत आणि नेरळ पोलिस यांनी गुलाब पुष्प देवून ईद निमित्त शुभेछा दिल्या.

यावेळी पोलिस उपअधीक्षक डी.डी. टेले तसेच कर्जत पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी आपल्या पोलिस कर्मचारी यांच्यासह उपस्थित राहत शुभेछा दिल्या. नेरळ येथील जामा मशीद बाहेर नेरळ पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि पोलिस उपनिरीक्षक यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version