रुईयाचा जागतिक पर्यटन दिन ऑनलाइन साजरा

। सिद्धी भगत ।
।अलिबाग । वार्ताहर ।
रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय अंतर्गत रुईया बी. वोक टुरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट विभाग यांनी आयोजित केलेला जागतिक पर्यटन दिन 2021 हा कार्यक्रम 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत पार पडला.
मजागतिक पर्यटन दिनफ हा कार्यक्रम दर वर्षी णछथढज या आंतराष्ट्रीय संस्थेने प्रदान केलेल्या थिम वर साजरा केला जातो. या वर्षी देखील णछथढज ने मपर्यटना बरोबर समावेशक वाढफ या थिम ला महत्त्व आणि स्वीकृती दिली. सर्वांना सामावून घेणे म्हणजेच समाजात समान स्थान, दर्जा व आर्थिक संधी समान असणे.
रुईया मधील टुरिजम अँड इन्कलुसिव्ह ग्रोथ एम्ब्रेसिंग द वॅाइसेस ऑफ डायव्हर्सिटी हा सोहळा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने व फार उत्साहाने साजरा करण्यात आला.
या पूर्ण कार्यक्रमाला फक्त भारतीय प्रेक्षकांनी नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. पर्यटन म्हणजे फिरणे नव्हे तर त्या मध्ये अदृश्य गोष्टी असतात ज्या आपल्याला लगेच कळून येत नाहीत. बरोबर अशाच काही गोष्टी घेऊन सादर केलेला हा कार्यक्रम अगदी फळफळून यश पावला. तर मग तुम्ही देखील फिरत राहा, सुरक्षित राहा आणि पुढच्या इव्हेंट्स बद्दल जाणून घेण्यासाठी ruiabvocttm ला फॉलो करत राहा!

Exit mobile version