रुक्मीणी गावडे यांचे निधन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी शहरातील आनंदवन गृहनिर्माण सोसायटी सालईवाडा येथील रहिवासी रुक्मीणी कृष्णा गावडे (86) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मुळच्या चौकुळ येथील रहिवासी होत्या. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सावंतवाडी येथून निवृत्त झालेले कनिष्ठ अभियंता ए.के गावडे तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांची ती आई तसेच ओंकार गावडे यांची ती आजी होत. त्याच्या पश्‍चात दोन मुलगे, सुना, नातवंडे विवाहित मुली, जावई असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version