सु. ना. कुळकर्णी यांचे निधन

। अलिबाग । वार्ताहर ।
कोएसोचे निवृत्त मुख्याध्यापक सुभाष नारायण कुळकर्णी यांचे दि.15 जुलै रोजी थळ (राजमळा) ता.अलिबाग येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या वयाच्या 75 व्या वर्षी आकस्मित निधन झाले. कुळकर्णी हे मूळचे पुण्याचे असले तरी मागील तीस वर्षे ते अलिबागवासी आहेत. मुख्याध्यापक म्हणून अत्यंत हुशार, प्रामाणिक, उत्तम प्रशासक होते. जिल्हा मुख्याध्यापक संघ, निवृत्त मुख्याध्यापक संघटना यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 24 जुलै व उत्तर कार्य मंगळवार दि.26 जुलै रोजी थळ येथे होणार आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी संध्या कुळकर्णी मुलगे डॉ.सिध्दार्थ, सागर व मुलगी, श्रेया आहेत.

Exit mobile version