| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गुरुवारी (दि.6) पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथे ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व पिल्लई कॉलेजच्या कार्यकारी संचालिका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामुळे मूनवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याबद्दल रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांनी गुरुवारी (दि.7) आपल्या सहकार्यांसह त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चांदोरकर, सुरेश राऊत, सानिका घाडी, चंद्रकांत खोत, लाईक कप्तान, राजेंद्र घरत, सतिश घाडी, प्रवीण घाडी, रुस्तुम कुर, मुनावर कुर, सर्फराज काझी, अजीज कुर, सूचित थळे, संतोष बांद्रे, मूनाफ बाबा, प्रतीक पाटील, निमिष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.