सचिन जाधव यांचे निधन

| रायगड | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग अंतर्गत श्री. सचिन विठ्ठलराव जाधव हे ग्रामीण रुग्णालय मुरुड तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे समुपदेशक म्हणून कार्यरत होते. सचिन जाधव सोमवारी (दि.22) अलिबागवरून कल्याण येथे जात असताना कळंबोली सेक्टर 20 अकस्मित अपघाती निधन झाले. त्यावेळी ते 42 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी कल्पना सचिन जाधव व मुलगी स्नेहल सचिन जाधव व त्यांचे आईवडील, बहीण-भाऊ असा परिवार असून सचिन जाधव यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version