सहा एकदिवसीय विश्वचषकात 2278 धावा
| मुंबई | प्रतिनिधी |
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा विक्रम मोडणं कठीण आहे. सचिन तेंडुलकरने एकूण सहा विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1992 ते 2011 या 24 वर्षांत सहा विश्वचषक खेळणाऱ्या सचिनच्या नावावर धावांचा डोंगर आहे. आता खेळणारा कोणताही खेळाडू त्याच्या आजूबाजूलाही नाही.
सचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीत विश्वचषकाच्या 45 सामन्यातील 44 डावात 56.96 च्या जबराट सरासरीने 2278 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये सहा शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. आता विश्वचषख खेळत असलेल्या खेळाडूमध्ये विराट कोहली आहे, पण, विराट कोहलीला 26 सामन्यात 1030 धावा करता आल्या आहेत. त्याशिवाय न्यूझीलंडच्या टेलरने 30 डावात 1002 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 21 सामन्यांत 992 आणि रोहित शर्मा 978 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पाँटिंगच्या नावावर 1743 धावांची नोंद आहे.