सचिनच्या पुतळ्याचे 1 नोव्हेंबरला अनावरण

| मुंबई | वृत्तसंस्था |

मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी होमग्राऊंड असलेल्या वानखेडेवर विश्वचषक स्पर्धेदरम्यान मोठा सन्मान होणार आहे. 1 नोव्हेंबरला त्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

महान खेळाडूंचा पुतळा स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात मुंबई क्रिकेट संघटनेने आघाडी घेतली आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरात प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर सचिनचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा मुंबई क्रिकेट संघटनेने अगोदरच केली होती. आता विश्वकरंडक स्पर्धेचे औचित्य साधून त्याला मूर्तरूप देण्यात येणार आहे. वानखेडेवर 2 नोव्हेंबरला भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी अनावरचा हा सोहळा दिग्गज आजी-माजी खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडेल, असे मुंबई क्रिकेट संघटनेकडून सांगण्यात आले. याच वानखेडे स्टेडियमवर सचिन आपला अखेरचा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून निवृत्त झालेला होता.

Exit mobile version