| खोपोली | प्रतिनिधी |
महामार्गावरील भीषण अपघात असो, पूरपरिस्थिती, दरडी कोसळणे, धबधब्यात अडकलेले पर्यटक, वन्यजीव बचाव किंवा कोणतेही नैसर्गिक संकट शासकीय यंत्रणांसोबत खांद्याला खांदा लावून कोणत्याही अपेक्षेशिवाय जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक जाणीवेतून मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी हेल्प फाऊंडेशनच्या आपत्कालीन बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संसाधने व साहित्य उपलब्ध करून देत संस्थेच्या कार्याला मोलाची साथ दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी किसन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करण्यासाठी हे दोघेही सातत्याने प्रयत्नशील आहेत. कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात ही सुरक्षा संसाधने हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि निलेश कुदळे यांच्याकडे केतन बेलोशे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. हा केवळ साहित्य वितरणाचा कार्यक्रम नव्हता, तर गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या हेल्प फाऊंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या समर्पणाचा गौरव करणारा क्षण होता.
हेल्प फाऊंडेशनला सुरक्षेची साथ

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606