माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून जल्लोषात स्वागत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील चेंढरे येथील शिवसेनेचे सागर सुरेश बडमे यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शहरातील शेकापचे नेते तथा अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते बडमे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक आदींसह चेंढरे येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सागर बडमे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये होते. मात्र, त्यांची घोर निराशा झाली. अखेर प्रशांत नाईक यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी मंगळवारी (दि.11) शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात बडमे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे बडमे यांच्या पक्षप्रवेशामुळे शेकापला अधिक बळ मिळाले असून, शिवसेनेत खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे.







