रेल्वे स्पोर्टसला सांघिक विजेतेपद
। मुंबई । प्रतिनिधी ।
13 वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा मोठ्या दणक्यात तेलंगणाच्या खम्मम शहरात पार पडली. या स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने संस्मरणीय कामगिरी करीत भारत श्रीचा बहुमान पटकाविला.
भारत श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या द्वंद्वात सागरसमोर अत्यंत कडवे आव्हान होते. तेव्हा सागरने आपल्या पीळदार पोझेसनी जजेसना मोहित केले आणि तामिळनाडूच्या एम. सर्वानन आणि आर. कार्तिकेश्वर या तगड्या खेळाडूंवर मात करीत पहिल्यांदा भारत श्री स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होण्याचा भीमपराक्रम केला.
स्पर्धेपूर्वी सार्याच्याच मनात धाकधुक होती. दुसरीकडे पुन्हा एकदा करोनाचे संकट गहिरे होत चालले होते. स्पर्धा होणार की नाही ? याबाबत शंका होतीच, पण करोना खम्मम शहरापासून लांब असल्यामुळे आयोजक इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने फक्त स्पर्धाच आयोजित केली नाही तर डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन केले. या आयोजनात हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष खम्मम शहरवासियांनी प्रथमच अनुभवता आला. त्यामुळे स्पर्धेचं सारं काही अद्वितीय, संस्मरणीय होतं. अशा या दिमाखदार भारत श्री स्पर्धेत सागरचे यशही डोळे दिपवणारे असेच होते. करोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता. मात्र भारत श्री स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. त्याने कोणतेही ध्येय डोळ्यासमोर ठेवले नव्हते. पण त्याच्या परिश्रमाने त्याला अनोखे जेतेपदाचे फळ जिंकून दिले. आजवर सागर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत फक्त आपल्या 80 किलो वजनी गटात विजेता व्हायचा, पण आज त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.
महाराष्ट्राच्या तौसिफला सुवर्ण
70 किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडूच सोने जिंकू शकला. गतवर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला महेंद्र चव्हाण 90 किलो वरील गटात दुसरा आला. याव्यतिरिक्त फिटनेस
- मला आता यापेक्षा मोठी कामगिरी करायची आहे. मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. रेल्वे जसे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतं, पाठिंबा देतं. तशी साथ मला त्यांची लाभली तर माझी कामगिरी आणखीन सरस होऊ शकते. – सागर कातुर्डे