सागरगड -माची आदिवासीवाडी रस्ता तातडीने दुरुस्तीचे आदेश

उद्या होणार बैठक
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला अलिबाग तालुक्यातील सागरगड माची आदिवासी वाडीचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहे.
हा रस्ता व्हावा यासाठी अलिबाग येथील साप्ताहिक कुलाबा वैभवचे संपादक बळवंत वालेकर यांनी निवेदन सादर केले होते.त्याची दखल घेत राज्यपालांनी हा रस्ता अद्याप का झाला नाही याची विचारणा केली आहे.त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात गुरुवारी 18 नोव्हेंबर दुपारी 3.45 वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.या रस्त्यासाठी सन 2009 मध्ये 47.75 लक्षच्या चार कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती.मात्र त्याचा निधीच वितरित झाला नसल्याचे वालेकर यांनी राज्यपालांच्या सादर केलेल्या निवेदनात सुचित केले आहे.

Exit mobile version