। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील ग्रामीण टेनिस सामन्यांना सुरूवात झाल्याने ग्रामीण क्रिकेट खेळाडूंमध्ये नवचैतन्य पसरले आहे. ग्रामीण क्रिकेट खेळाडूंमधील दडलेल्या खिलाडूवृत्तीला वाव मिळावा या उद्देशाने कै. रामकृष्ण पालांडे व लहू अर्जून पिंगळे यांच्या स्मरणार्थ अविनाश पालांडे यांनी श्री दत्त क्रिकेट संघ घोडीवली, कांढरोली आणि मित्र परिवार यांच्यावतीने क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते.
चार दिवसीय सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक सहकार नगर, द्वितीय धामणी, तृतीय माडप तर चतुर्थ क्रमांक घोडीवली संघाने पटकावल्याने या सर्व विजयी संघाना घोडीवली ग्रामस्थ व प्रमुख अथितींच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षण चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच, उकृष्ट गोलंदाज, उकृष्ट फलंदाज, मालिकावीर खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. या क्रिकेट चषकाचे आयोजन अविनाश पालांडे, अतुल पिंगळे, सोहम पिंगळे, रोहिदास पिंगळे, रवी भोपी, अनिल, समीर पवार, बाबू पारंगे, प्रशांत पिंगळे, सुभाष दुधावडे, अरुण पिंगळे, संजय सोलखी यांनी केले होते.






