। उरण । वार्ताहर ।
गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करणार्या सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेने उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविली होती. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या उरण विभागाच्या पदाधिकार्यांनी एकत्र येत द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई केली. यात सहा वर्षांच्या साई गोवारी या चिमुकल्याचा सहभागदेखील प्रेरणादायी होता. सह्याद्री प्रतिष्ठानच्या या दुर्गसंवर्धन मोहिमेचे कौतूक होत आहे.