तळा येथे साई पालखी सोहळा

| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील ओम साईराम सेवा मंडळातर्फे साई पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीस तळा ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये झोळी दर्शन, साई पालखी मिरवणूक, अखंड पारायण, भजन, महापूजा, होमहवन, आरती, साई भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यानुसार 21 जानेवारी रोजी साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये पायी पदयात्रा करून आलेले साईभक्त तसेच शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.पारंपरिक खालू बाजा व भजनाच्या तालावर तसेच ओम साईराम च्या जयघोषात साईभक्त तल्लीन झाले होते. यावेळी साई बाबांचे हुबेहूब रूप धारण केलेले शहरातील विलास ठक्कर पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.तळा बाजारपेठेत नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर साईंची पालखी पंचपरमेश्‍वर मंदिराकडे मार्गस्थ झाली.

Exit mobile version