सायराबानू काव्यभूषण पुरस्कार

| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सायराबानू वजीर चौगुले यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौगुले या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून माणगाव तालुक्यात गेली अनेक वर्ष काम करीत आहेत. त्यानी वेगवेगळ्या विषयांवर लेख व कविता लिहून त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले आहे.

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत त्यांनी सलग दोन वर्ष सहभाग घेऊन उत्तम कविता या संस्थेकडे सादर केल्या. यांच्या साहित्यकलेच्या सन्मानार्थ त्यांना अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे माणगाव तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version